कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चौसाळा गावाची संरक्षक ढाल बनून २४ तास पहारा देणारा कर्तव्यदक्ष सरपंच मधुकर तोडकर , मास्क नसेल तर १००रु दंड वसूल करून मास्क देऊन जनजागृती केली जाते– डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२४:आठवडा विशेष टीम बीड जिल्ह्यातील सरपंच यांचा रूबाब आणि गावाच्याप्रति असणारी आस्था आणि कर्तव्यदक्षता या बद्दल फारसं अनुकूल मत नाही.अर्थातच काही गावांतील सरपंचाचा अपवाद वगळता, बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर जरी सध्या गावोगावी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात येतानाचे चित्र आपल्याला दिसत असले तरी बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला नव्हता तेव्हा म्हणजे दिड महिन्यांपासून चेकपोस्ट, चोर रस्ते जेसीबीच्या मशिनने उकरणे आणि दक्ष नागरीकांचे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन त्यात स्वत: अग्रणी राहुन अविरतपणे कार्य करणे,ही आगळीवेगळी वैशिष्ट्ये चौसाळा ग्रामपंचायत सरपंच मधुकर तोडकर, त्यांचे सहकारी संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे, ग्रामसुरक्षा दलाचे त्रिवेणी

मधूकर तोडकर , सरपंच चौसाळा ग्रामपंचायत

आमचे चौसाळा जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे यांच्या व्यवस्थापनाखाली बाहेर राज्यातील होम क्वारंटाईन लोकांची व ऊसतोड मजुरांची आदर्श विद्यालयात राहण्याची व जेवणाची सोय केली. त्याचवेळी बाहेर गावावरून उद्भवणा-या संभाव्य धोक्याची कल्पना आल्यामुळे दिड महिन्यांपूर्वी आमचे सहकारी यांच्याशी चर्चा करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली.आणि चोर मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यासाठी जेसीबीच्या मशिनने रस्ते उकरले.आणि मुख्य रस्त्यावर ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवक कडक शिस्तीत पहारा देत गावचे रक्षण करतात.

बाजीराव त्रिदार , रविराज देशमुख, रविराज पाठक , बाळुकाका नहार : ग्रामसुरक्षा दलातील सदस्य

आम्ही सर्वांनी मिळून कोरोनापासुन गावचे रक्षण करायचे असेल तर गावात बाहेर गावावरून येणारी अनावश्यक लोकांचा वावर थांबवला पाहिजे,या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली. आम्ही गावात येणा-या आणि गावाच्या बाहेर जाणा-या प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी करतो. मास्क नसेल तर त्यांच्याकडुन १०० रु दंड वसुल केला जातो आणि रीतसर ग्रांमपंचायतीचे पावतीबुक छापलेले असुन त्याची पावती दिली जाते, त्या मोबदल्यात त्याला मास्क वाटप केला जातो. अत्यावश्यक सेवा उदाहरणार्थ आरोग्य सेवा , पोलिस अथवा शासकीय कामानिमित्ताने गावात प्रवेश करणा-या व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो अन्यथा नाकारण्यात येतो.संशयास्पद आणि हुज्जत घालणाऱ्या व्यक्तींना पोलिस प्रशासनाच्या हवाली केले जाते.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश :

स्वत:चर्या गावाच्या संरक्षणार्थ कोरोना या राष्ट्रीय आपत्तीचे गांभीर्य जाणुन सुरूवातीपासूनच चेकपोस्ट आणि नाकाबंदी करणा-या आणि जरब बसवण्यासाठी दंडस्वरूपात मास्क न लावणा-यांना दंड स्वरूपात मास्क वाटप करून जनजागृती करणा-या ग्रामसुरक्षा दलाचे आणि सरपंचाच्या सतर्कतेचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना आदर्श ठरावे असे काम चौसाळा गावचे सरपंच मधुकर तोडकर , सामाजिक कार्यकर्ते संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे आणि ग्रामसुरक्षा दलाचे कर्तव्यदक्ष सभासद बाजीराव त्रिदार, रविराज देशमुख, रविराज पाठक , बाळुकाका नहार यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघाताने जिवितहानी अथवा वित्तहानी होऊ शकते ,कामे तात्काळ करावीत―डॉ.गणेश ढवळे
Next post बीड: शुक्रवार पेठ परिसरामध्ये महिलेसह २ मुलांचे मृतदेह ,एक संशयित ताब्यात