बीड: शुक्रवार पेठ परिसरामध्ये महिलेसह २ मुलांचे मृतदेह ,एक संशयित ताब्यात

बीड शहर:आठवडा विशेष टीम― शहरातील पेठबीड पोलीस ठाणे हद्दीतील शुक्रवार पेठ परिसरामध्ये महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आज दि.२४ रविवार रोजी दुपारी आढळला आहे. या तिघांचाही खून करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संगीता संतोष कोकणे (३५), सिद्धेश्वर संतोष कोकणे (९) व मयुर संतोष कोकणे (६) अशी मयतांची नाव आहेत. संगीता व सिद्धेश्वर यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आली तर मुयरचा मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये आढळून आला. सदरील प्रकार हा अनैतिक संबधांतून घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या संतोष कोकणे यास पोलीसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विश्वास पाटील सह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.