कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हाब्रेकिंग न्युज

जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले ,जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४४१ झाली

जळगाव दि.२४:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 17 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *तेरा* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर तळवेल, ता. भुसावळ, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.