वनाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली शिकारीची घटना, सोयगाव वनपरिक्षेत्राची बेधडक कामगिरी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मा. उपवनसंरक्षक एस.पी वडस्कर यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात अवैध वृक्षतोड, अवैध वनोपजाची वाहतूक, अवैध शिकार, अतिक्रमण इत्यादी वनगुन्ह्यावर प्रतिबंध करण्यासाठी सोयगाव वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी नियमित पायदळ गस्त करीत आहेत. याच गस्ती दरम्यान रात्री ११.००वा. च्या सुमारास वेताळवाडी पश्चिम बीटात गस्त करीत असताना वेताळवाडी धरणालगत अवैध शिकारीकरिता ९ जाळे लावल्याचे दिसून आले. वनाधिकारी आरोपीला पकडण्यासाठी रात्रभर जंगलात दबा धरून बसले होते परंतु सकाळी सात वाजेपर्यंत कोणीही त्याठिकाणी आले नाही तदनंतर वनाधिकाऱ्यांनी सदरील जाळे जप्त करून पुढील रीतसर कारवाई केली सदरील जाळ्याचा प्रामुख्याने वापर रानडुक्कर व ससे पकडण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर लहान आकाराचे इतर वन्यप्राणी सुद्धा या जाळ्यात अडकतात वनाधिकाऱ्यांची नियमित गस्त व सतर्कतेमुळे शिकारीच्या घटनावर आळा बसला असून अवैध कृत्य करणाऱ्याना चांगलाच चाप बसला आहे सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक डी.आर.वाकचौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी.सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बी.एच.पाटील ,जी .वाय .परदेशी ,एस. के. चांदवडे , वाय.एस.बोखारे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.