सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन पंचावन्न वर्षीय आरोग्य सेवकाने आत्महत्या केली हि घटना दि.४बुधवार सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील जंगला शिवारात घडली.या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
पोलिस सुत्रान कडून प्राप्त माहिती अशी की गोविंदा पंढरी कोकाटे (वय ५५) रा.सोयगाव यांनी फर्दापूर-सोयगाव मार्गावरील जंगला शिवारातील गट क्रमांक ११७ मधील स्वतःच्या शेतातील मोयच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना दि.4 बुधवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली मयत गोविंदा पंढरी कोकाटे हे आरोग्य विभागाच्या वरखेडीबुद्रूक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते.घटनेची माहिती मिळताच पो.ना.सुनिल भिवसने प्रवीण गवई यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला दरम्यान ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे वैद्यकीय अधिकारी घोरपडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले आरोग्य सेवक म्हणून गोविंदा पंढरी कोकाटे कार्यरत होते.या प्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आलेली आहे.या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहुरे यांच्या मार्गदर्शनावरुन सुनिल भिवसने,शांताराम सपकाळ,प्रवीण गवई हे करीत आहे.
0