बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

औरंगाबाद :वेताळवाडी(सोयगाव) च्या जंगलात वनविभागाची वाॅश आउट मोहीम ,फासपारध्यांचा लावला बंदोबस्त

वनविभागाच्या सतर्कतेमुळे टळली शिकारीची घटना

सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावच्या वेताळवाडीच्या घनदाट जंगलातील फासपारध्यांचा रचलेला गेम अखेरीस वनविभागाच्या पथकाने उधळून लावत या भागातील वन्यप्राण्यांच्या शिकारींना चाप बसविण्याची वाॅश आउट मोहीम सोयगाव वनविभागाच्या पथकाने सोयगावला राबविली आहे.या मोहिमेत पहिल्याच पदार्पणात वनविभागाला यश आले आहे.त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार टळली आहे.
उपवनसंरक्षक एस.पी वडस्कर यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात अवैध वृक्षतोड,अवैध वनोपजाची वाहतूक,अवैध शिकार, अतिक्रमण इत्यादी वनगुन्ह्यावर प्रतिबंध करण्यासाठी सोयगाव वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी नियमित पायदळ गस्त करीत आहेत. याच गस्ती दरम्यान रात्रीच्या अकरा वाजेच्या सुमारास वेताळवाडी पश्चिम भागात गस्त करीत असताना वेताळवाडी धरणालगत अवैध शिकारीकरिता ९ जाळे लावल्याचे दिसून आले.या जाळ्यांचा अंदाज पाहून गस्तीतील वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर या भागात दबा धरून बसले, परंतु पहाटे सात वाजेपर्यंत कोणीही त्याठिकाणी आले नाही.त्यानंतर वनविभागाच्या पथकाने सदरील जाळे जप्त करून पुढील कारवाई केली.यामुळे वेताळवाडीच्या जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकारीवर चाप बसला आहे,व फासपारध्यांवर वचक बसला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी सांगितले.

वेताळवाडीच्या जंगलात लावण्यात आलेल्या जाळ्याचा प्रामुख्याने वापर रानडुक्कर,ससे,घोरपडी,बिबट्यांचे पिल्लू, पकडण्यासाठी करण्यात येतो.लहान आकाराचे इतर वन्यप्राणी सुद्धा या जाळ्यात अडकतात.परंतु वनविभागाच्या नियमित गस्त व सतर्कतेमुळे शिकारीच्या घटनावर आळा बसला असून अवैध कृत्य करणाऱ्याना चांगलाच चाप बसला आहे.

या भागात आलेल्या शिकारींच्या घटनास्थळावरील पगमार्ग तपासणीसाठी घेण्यात आले असून या फुटस्टेपवरून आलेल्या पावलांच्या खुणांवरून जाळे लावण्यात आलेल्यांचा शोध घेणे शक्य होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी सांगितले.सहाय्यक वनसंरक्षक डी.आर.वाकचौरे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भिका पाटील,गणेश परदेशी,सुनील चांदवडे,यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *