औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यात कोरोनाचा बळी ; सोयगाव तालुका हादरला ,सोयगावचा सिल्लोडशी संपर्क तोडला

सोयगाव दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सिल्लोड तालुक्यात कोविड-१९ चा पहिला बळी गेल्याने सोमवारी सोयगाव तालुका हादरला.प्रशासनाची चिंता वाढली असल्याने सोयगावचा सिल्लोडशी संपर्क तोडण्यासाठी परिवहनची बससेवा बंद करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला असल्याने सोमवारपासून दुपारनंतरची परिवहनच्या बसेसची सिलोडसाठीची चाके ठप्प झाली आहे.
सिल्लोड तालुक्यात ६५ वर्षीय महिलेचा बळी गेल्याची वार्ता सोयगाव तालुक्यात पसरताच सोयगावला हादरे बसले होते,नुकत्याच सिल्लोड-सोयगाव बससेवा सुरु करण्यात आलेल्या असतांना सिल्लोडशी संपर्क तोडण्याचा निर्णय सोयगाव तालुका प्रशासनाने घेतल्याने सोमवार पासून सोयगाव-सिल्लोड बससेवा ठप्प करण्यात आल्या आहे.सोयगाव पासून सिल्लोडचे अंतर ५५ कि.मी आहे.परंतु नुकताच सिल्लोड तालुक्यात कोविड-१९ च्या प्रमाणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले असून एक बळी गेल्याने सोयगाव तालुक्यात मोठी चिंता पसरली आहे.त्यामुळे सिल्लोडशी तूर्तास संपर्क तोडण्यासाठी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल आहे.

कोविड-१९ मधून सोयगाव तालुका अद्यापही कोसो दूर असर्तांना महसूल.आरोग्य आणि पंचायत समिती विभागांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे सोयगाव तालुक्यात अद्यापही एकही संशयित रुग्ण नसून परंतु शेजारील सिल्लोड तालुक्यात नुकताच पहिला बळी गेल्याने सोयगाव तालुका प्रशासन सतर्क झाले आहे.

सोयगावला शासकीय कार्यालयात सिल्लोड वरून अनेक कर्मचारी ये-जा करतात परंतु नुकत्याच तीन दिवसाच्या सलग सुट्यामुळे मंगळवारी सोयगावला शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post औरंगाबाद: सोयगावला उच्चांकी तापमानाची नोंद ,तापमानाचा पारा सोयगाव ४६℃
Next post शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा–जिल्हाधिकारी उदय चौधरी