गोंदिया: कोरोनाचे सत्र थांबता थांबेना ,जिल्ह्यात आज पुन्हा चार नवे रुग्ण,जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४८

गोंदिया:बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)― जिल्ह्यात आज २५ मे रोजी ४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ४८ इतकी झाली आहे.यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४७ इतकी आहे.२६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला.उपचारानंतर तो १० एप्रिलला कोरोनामुक्त होऊन घरी परतला.सलग ३८ दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा १९ मे रोजी २ रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.२१ मे रोजी तब्बल २७ रुग्ण,२२ मे रोजी १० रुग्ण,२४ मे रोजी ४ आणि आज २५ मे आणखी ४ नव्या रुग्णाची भर पडली. आहेत.त्यामुळे आता जिल्हयात ४८ रुग्ण संख्या असून यामध्ये ४७ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत.
जिल्‍ह्यातील ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे तो भाग कन्टेटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.जिल्ह्यात एकूण ११ कंटेंटमेंट झोन असून यामध्ये अर्जुनी/ मोरगाव तालुका – अरुणनगर व करांडली. सडक/अर्जुनी तालुका- तिडका,रेंगेपार व सलईटोला. गोंदिया तालुका-कटंगी व परसवाडा, गोरेगाव तालुका – गणखैरा व आंबेतलाव, तिरोडा तालुका -तिलकनगर व तिरोडा आणि सालेकसा तालूका धनसुवा या गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७७१ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने विषाणू चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ४८ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक तर ५१२ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे.१२ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.आज २५ मे रोजी ८३ नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे.
जिल्ह्यातील गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे १९१, आमगाव येथे १२, अर्जुनी /मोरगाव येथे ५८, सडक/अर्जुनी येथे ६७, नवेगावबांध येथे २९, गोरेगाव येथे २२, देवरी येथे २, सरंडी तिरोडा येथे २० आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ६ असे एकूण ४०७ संशयित रुग्ण आज सायंकाळी ७ वाजतापर्यंत भरती आहे.
शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १३ लईटोला येथे ५, तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे ३,समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ८, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४,आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथे ७,उपकेंद्र घटेगाव येथे ६ आणी राधाकृष्ण हायस्कुल केशोरी येथे ४२ असे एकूण १०० व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. अशी माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.