सोयगाव दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मुख्यवीज वाहिनीतून अति क्षमतेने अचानक वीज वाहक झाल्याने शेती पंपाच्या रोहीत्राचा अचानक स्फोट होवून बैल ठार झाला असून बैलगाडीचा कोळसा होवून दोन जनावरे स्फोटातील आगीत जखमी झाल्याची खळबळजनक घटना नांदगावतांडा ता.सोयगाव गावालगत मंगळवारी दुपारी घडली.या रोहित्राच्या स्फोटाच्या आवाजाने अख्खे नांदगावतांडा हादरले होते,घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महसूल आणि महावितरणच्या पथकांनी धाव घेतली व पंचनामे केले.या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाने दिली आहे.
अति उच्चदाबाच्या वीज वाहिनीच्या जोडणी केलेल्या नांदगावतांडा शिवारातील एका शेतातील रोहित्रावर अचानक दाब वाढल्याने या रोहीत्राचा स्फोट झाला या स्फोटात शेत्च्या गट क्रमाक-३४ मध्ये शेतकरी रमेश मगन पवार यांची बैलगाडी बैलांसह सोडून झाडाखाली दुपारच्या विसावा घेत असलेल्या दोन्ही बैल आणि गाय अशा तीन जनावरांना स्फोटामुळे लागलेल्या आगीचा फटका बसून दावणीला बांधलेल्या जनावराचा या आगीत कोळसा झाला असून स्फोटात एक बैल जागीच ठार झाला तर उर्वरित एक बैल आणि गाय अशी दोन जनावरे भाजून गंभीर जखमी झाले आहे,बैलगाडीचा मात्र सोफ्तातील आगीत कोळसा झाला असून या आगीच्या भाक्षात शेतकऱ्याचे अर्धा एकर शेत जळाले असल्याने यातील ठिबक सिंचनच्या नळ्या जळून खाक झाल्याने अंदाजे शेतकऱ्याचे चार लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.अचानक गावालगत असलेल्या या शेतीपंपाच्या रोहित्राच्या स्फोटाच्या आवाजांचे लोळ गावात गेल्याने अनेकांना काहीक्षण भानच राहिले नसल्याने अख्खेगाव या स्फोटात हादराल्याने गोंधळ उडाला होता.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मधुकर धोंडकर,तलाठी ललित पाटील(कुलट)आदींच्या पथकाने धाव घेवून मृत बैलासह घटनेचा पंचनामा केला आहे.बनोटी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अविनाश कुंडे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेवून वीज पुरवठा तातडीने बंद केला होता.
शेतकरी रमेश पवार यांनी जनावरांना दुपारचा विसावा म्हणून झाडाखाली बैलजोडीसह जनावरांना दावणीला बांधले परंर्तू अचानक रोहित्राच्या झालेल्या स्फोटाने मिनिटात शेतासह जनावरांची राख केली.यामध्ये एक बैल राहोत्राच्या स्फोटात ठार झाला असून दोन जनावरे गंभीर भाजली आहे.झाडाखाली असलेल्या जनावरांचा सहा महिने पुरेल इतका चारा शेतकऱ्याने गंजी लावून भरून ठेवला होता या चाऱ्याच्या गांजिला आग लागून चाऱ्याचीही राखरांगोळी झाली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी घटनास्थळी भेट देवून शेतकऱ्याचे सांत्वन करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
आगीच्या भक्षस्थळी मदत कार्य करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली,परंतु आग हि रोहित्राच्या स्फोटाची असल्याने मदतकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तरीही विजय पवार,संजय पवार,दिनेश पवार,पोपट हारणे,वासिम शेख,कल्पेश वाघ,अतुल; उगले,आबा उगले आदींनी मदत कार्य करून आग नियंत्रणात आणली,परंतु तोपर्यंत सारेकाही राख झाले होते.
नांदगावतांडा ता.सोयगाव शिवारात रोहीत्राचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच महसूलच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाठविण्यात आले आहे.महसूलच्या पथकाचा आगीचा पंचनामा तातडीने पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे.त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनांनुसार शेतकऱ्याला मदतीस पात्र ठरविण्यात येईल
―प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव
नांदगावतांडा शिवारातील घटनेप्रकरणी पथकाला पाठविण्यात आले आहे.पंचनाम्याची माहिती आल्यावर अहवाल कार्यकारी अभियंता(कन्नड) व मुख्य अभियंता(औरंगाबाद) महावितरण यांना तातडीने अहवाल सादर करण्यात येईल.
―अभिजित गौर
सहायक अभियंता सोयगाव