नागरिकांनी घाबरू नये ,आम्ही व प्रशासन आपल्या सोबत आहोत― खा.डॉ.प्रितमताई मुंडे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यात स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिकांपैकी , एकही कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण नाही.मात्र सध्याला रूग्ण आढळून आलेले , जवळपास सर्वच रुग्ण हे मुंबईवरून आलेले दिसत आहेत.. त्यामुळे माझी मुंबईवरून आलेल्या आणि येणाऱ्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे , की आपल्या सर्वांचे आप्तस्वकीयांवर प्रेम आहे..त्यामुळं येताना सर्वांनी काळजी घेऊन खबरदारी घेऊन या , व आल्यानंतर आपल्या आप्तस्वकीयांपासून, सुरक्षित अंतर ठेवून सोशल डिस्टनसिंगने वागावं..त्यामुळे वाढत असणारा धोका हा कमी होईल..तर दुसरीकडं बीड जिल्ह्यात वाढत असणाऱ्या रुग्णांमूळ, कोणीही घाबरू नये..आम्ही व प्रशासन आपल्या सोबत आहोत असं खासदार पितम मुंडे यांनी बीडमध्ये आल्यानंतर जिल्हावासीयांना आवाहन केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.