आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा ; मेडिकल स्टुडंट्स असो तथा जन क्रांती वैद्यकीय संघ ची मागणी

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व विद्या शाखा च्या विद्यार्थी च्या उन्हाळी परीक्षा बद्दल चा निर्णय लवकर घेऊन 5 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी च्या समस्या सोडवा अशी मागणी मेडिकल स्टुडंट्स असो.तथा जन क्रांती वैद्यकीय संघ चे संस्थापक डॉ संदीप घुगरे यांनी महाराष्ट्र राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी आणि विद्यापीठ कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना ई-मेल मार्फत केली.
विद्यापीठाची मे -जून 2020 उन्हाळी परीक्षा आणि महाराष्ट्र मधील कॉरोना संसर्गजन्य महामारी रोगामुळे राज्यात भरपूर समस्या निर्माण झाल्या आहेत ,त्यातच मागील 2 महिन्या पासून राज्यभर लॉगडाऊन असल्याने वैद्यकीय महाविद्यालय आगोदरच बंद केली असल्याने MBBS, BAMS, BHMS, Nursing विध्यार्थ्यांचा महाविद्यालयालियानं अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही,आणि सध्या परिस्थितीत लॉगडाऊन असल्याने विद्यार्थीचे शैक्षणिक साहित्य महाविद्यालयात ,वसतिगृहात असल्याने त्याना स्व अभ्यास करण्यासाठी साठी कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही, त्यातच कॉरोना संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्र भर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अशा परिस्थितीत विध्यार्थी 2020 च्या उन्हाळी परीक्षेला सामोरे जातीलच यातशंका आहे,
यापरिस्थित बाहेर लॉगडाऊन चालू असल्याने विद्यार्थी च्या पालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे,महाराष्ट्र हा कृषी प्रधान राष्ट्र असल्यामुळे आणि बाहेर कटकटीत उन्हला आहे व जुने- जुलै महिन्यात येणार पाऊसा मध्ये शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून,नोकरदार कुटुंबाकडे लक्षदेऊन कॉरोना संसर्गजन्य रोगाला सामोरे जाणार आहे आणि याआर्थिक अडचणीत पालक आपल्या विद्यार्थी च्या परीक्षा खर्च,खानावळ,आणि हॉस्टेल, रूम किराया देतीलच असे नाही,कॉरोना संसर्गजन्य रोगामध्ये जवळपास सर्वच शासकीय आणि निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे रुपांतर कॉरोना उपचारासाठी केले आहे.
यातच विद्यपीठ ने परीक्षा घेण्याचा निर्धार केलाच तर यासाठी लागणारा महाविद्यालियानं मनुष्यबळ कसे उपलब्ध होऊल, परीक्षा साहीत्य हे कॉरोना मध्ये निर्जंतुकीकरण केलेले असेलच यात शंकाच असेल,लॉगडाऊन मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय पर्यंत पोहचण्याची व्यवस्था काय असेल,विद्यार्थ्यांना परिक्षाला सामोरे जाण्यापुर्वी अभ्यासासाठी वेळ किती मिळेल? सर्व विद्यार्थी एकत्र आले तर परत कॉरोना संसर्ग होण्याची भीती यामध्ये विद्यार्थी च्या पालक त्याना महाविद्यालयात कडे जाण्याची परवानगी देतीच का? त्यात आर्थिक परिस्थिती बिकट असण्याचे काय हाल होईल? आशापरिस्थिती एखाद्या विद्यार्थ्यांला कॉरोना झाला तर त्याला निम्मेदार कोण असेल या आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी त्यांच्या पालक यांना निर्माण होत आहे.
अशातच कॉरोना लॉगडाऊन मुळे विद्यार्थ्यांनाचा महाविद्यालयाशी कोणताही संपर्क होत नाही ,तसेच विद्यपीठच्या संकेतस्थळ वर विद्यार्थ्यांना पूरेशी माहिती नसते, या सर्व प्रकारच्या गोष्टींचा राज्यपाल तथा आरोग्य विद्यपीठ नाशिक कुलगुरू यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी मेडिकल स्टुडंट्स असो.आणि जन क्रांती वैद्यकीय संघ यांनी केली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.