गोंदिया: आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सर्वच स्तरातून मागणी

गोंदिया:बिंबिसार शहारे जिल्हा प्रतिनिधी― कोरोना विषाणू प्रदूर्भावाचा फटका आधार नोंदी केंद्राना बसला. आधार केंद्र हे प्रत्यक्ष समपर्कात येणारा असल्याने लॉक डावूनचा परिणाम झाला. तिरोडा तालुक्यातील आधार सेवा केंद्र सुरू न झाल्याने सामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहेत.
अनेक शेतऱ्यांचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे आधार अपडेट नसल्याने खात्यात रक्कम जमा होण्याची अडचण होत आहे. अंगणवाडी सेविकांना गावात जन्म झालेल्या शिशुची नोंदी आधार केंद्रात करून त्याचे आधार बनवावे लागत असल्याने त्याची नोंदणी करणे कठीण झाले आहे. नवविवाह करून सासरी येणाऱ्या सुवसनीचे आधार अपडेट ची कामे जागच्या जागी थांबली आहेत.आधार कार्ड आजच्या घडीला यथावथ आणि जवळ बाळगणे एकप्रकारे बंधांकारकच होऊन बसले आहे.
बँकेत रांगा असल्याने आबालवृद्ध हे आधार लिंकद्वारे काढणे सोयीचे होते. पण त्यात समश्या उद्भल्यास आधार नोंद बँड असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी समस्यांची दखल घेऊन आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे मागणी सर्वच स्तरावरून होत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.