बीडमध्ये ४१ अहवाल निगेटिव्ह तर चार प्रलंबित

बीड दि.२७:आठवडा विशेष टीम बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 45 अहवालांपैकी 41 नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर चार नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबीत असल्याची माहिती लातूरच्या प्रयोगशाळेतून देण्यात आली आहे. प्रलंबीत नमुन्यांचा अहवाल रात्री उशीरापर्यंत प्राप्त होणार आहे. हे 41 नमुने निगेटिव्ह आल्याने बीडमधील कोरोनासाठी उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 45 वर तर बीड जिल्ह्यातील कोरोनाचा एकूण आकडा 55 वर स्थिर आहे. या 55 पैकी एकाचा मृत्यु झाला असून तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 6 जणांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड हा संपूर्ण जगाने भारताचा केलेला गौरव― रामदास आठवले
Next post सोयगाव वनपरिक्षेत्राची धडक मोहीम ,जंगलातांडा शिवारात शिकारीचे पाच जाळे जप्त ; शिकाऱ्यांचे मनसुबे उधळले