अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रात कोरोना सारख्या भयानक संकटात शेतकरी भरडला असून आर्थिक संकटात सापडला आहे.असे असतांना खरीपाचा हंगाम सुरू होण्या अगोदरच राज्य सरकारने सोयाबीन बियाणांत तब्बल 360/- रूपयांची भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.असा हा प्रकार असून
यामुळे शेतक-यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. किमान कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेवून तरी सोयाबीन बियाणांच्या किंमती वाढवू नयेत अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,यंदा कोरोना सारख्या संकटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शेतकरी व शेती व्यवसाय हा पुन्हा नेस्तनाबूत केला आहे.फार मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून एक दमडी त्याच्याजवळ सध्या खर्च करण्यासाठी नाही.खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना बी-बियाणे घेण्यासाठी फार मोठे आव्हान शेतक-यांच्या समोर आहे.मात्र या सा-या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या महाबीज महामंडळाने यंदा सोयाबीन बॅगमागे जवळपास प्रत्येकी
तीनशे साठ रूपयांची मोठी वाढ केल्याची माहिती मिळत आहे.राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचे उत्पादन हे शेतकरी घेतात.मात्र अशाप्रकारे केलेली भरमसाठ वाढ म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.? खरे तर सरकारने संकटाची तीव्रता पाहता यंदा शेतक-यांना खरिपाच्या पेरण्यासाठी बी बियाण्यांचा मोफत पुरवठा करायला हवा होता.? मात्र तसे न करता याउलट सोयाबीन बियाण्यांच्या किंमती कमी करण्यापेक्षा वाढ करून शेतक-यांना आर्थिक संकटात टाकले आहे.एकीकडे राज्य सरकार शेतक-यांसाठी एक रूपयाचे ही आर्थिक पॅकेज देत नाही आणि दुसरीकडे अशाप्रकारे सोयाबीन बियाणांच्या किंमती वाढवून पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकत आहे.राज्य सरकारने सोयाबीन बियाणांच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकरी वर्गातून आता संताप व्यक्त होत असून प्रचंड नाराजी पसरली आहे.प्रत्यक्ष खरिपाच्या पेरण्या चालू होण्यापूर्वी सरकारने तात्काळ या प्रश्नावर लक्ष घालावे व केलेली भाववाढ रद्द करावी अशा प्रकारची मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान यंदा पाऊस काळ चांगला असल्याची खात्री हवामान खात्याने दिली आहे.हे खरिपाच्या हंगामात बियाणांचा तुटवडा कमी होतो म्हणून शेतकरी अगोदरच सोयाबीन बियाणे खरेदी करतात मात्र सरकारने अशाप्रकारे एक नवीन भुर्दंड शेतक-यांच्या माथी मारला असून तात्काळ भाव कमी करावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.