#CoronaVirus बीड: एकाला कोरोनाची लागण

बीड:आठवडा विशेष टीम― आज बुधवारी पाठविलेल्या ४५ संशयितांच्या स्वॅबपैकी एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह‌ आला आहे. उर्वरित स्वॅब पैकी ४१ निगेटिव्ह असून ३ स्वॅबचा निष्कर्ष अद्यापही निघू शकला नाही.

आज पाॅझिटीव्ह‌ आलेला कोरोनाग्रस्त हा बीड तालुक्यातील बेलापुरीचा आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यापैकी ३ उपचारानंतर बरे झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे तर सहा जणांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. सध्या बीड जिल्ह्यात ४६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.