कार्यक्रमबीड जिल्हासामाजिक

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जयंतीनिमित्त माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन

मातोश्री रमाईंचा त्याग प्रेरणा देणारा-राजकिशोर मोदी

आठवडा विशेष|प्रतिनिधी

अंबाजोगाई : मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील माता रमाई आंबेडकर चौक येथे नामफलकास व प्रतिमेस बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी माता रमाई यांचे व्यक्तीमत्व,कार्य आणि त्याग हे सबंध भारतीयांसाठी प्रेरणा देणारे आहे.माता रमाई यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांना सुख- दुःखात खंबीरपणे साथ दिली.रमाई या कोटी-कोटी लेकरांच्या आई झाल्या.त्यांचे त्यागी जीवन हे पुढील कित्येक पिढ्यांसाठी कायम प्रेरणा देणारे ठरेल. नव्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य यातून प्रेरणा घेवून त्यांचे विचार आत्मसात करावेत व पुढे न्यावेत असे आवाहन यावेळी राजकिशोर मोदी यांनी केले.गुरूवार,दि. 7 फेब्रुवारी रोजी शहरातील माता रमाई आंबेडकर चौक येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई पिपल्स को-ऑप.बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक धम्मा सरवदे,माजी नगरसेवक गणेश मसने,माजी नगरसेवक डि.के.कांबळे,राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,माऊली वैद्य,अशोकराव देवकर, अजिम जरगर,अश्विन सावंत,सुमित वाघमारे आदींसहीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, परिसरातील माता- भगिनी यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button