सोयगाव तालुक्यात चार तलाठी सज्जांचा कार्यारंभ ;जरंडीला मंडळाचा दर्जा ,तहसीलदार पांडे यांची घोषणा

सोयगाव,दि.२८:आठवडा विशेष टीम―
सोयगावसह तालुक्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली तालुक्यातील वाढ याचा विचार करता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशावरून काही तलाठी सज्जांचे विभाजन करून चार नव्याने तलाठी सज्जा कार्यान्वित करण्यात आल्या असून एका महसुली मंडळाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.जरंडीला नवीन मंडळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा तहसीलदार प्रवीण पांडे यांनी गुरुवारी केली असून धनवट,उमरविहीरे,आमखेडा आणि नांदातांडा या चार नव्याने तलाठी सज्जांचा कारभार शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.त्यामुळे या चार नवीन सज्जांवर नवीन तलाठी तातडीने रुजू करण्यात आला असल्याने या चारही तलाठ्यांना कारभार सुपिर्द करण्यात आला आहे.
सोयगाव महसुली मंडळाचे विभाजन करून जरंडीला नवीन महसुली मंडळाचा दर्जा देण्यात आल आहे.या नवीन जरंडी महसूल मंडळात जरंडी,धिंगापूर,माळेगाव,पिंपरी,बहुलखेडा,रामपुरा,निंबायती,उमरविहीरे,कवली,तिखी,घोसला,नांदगाव,निमखेडी,तिडका,अन्जोळा,जंगलीकोठा,वाकडी,या १७ गावांचा सोयगाव आणि बनोटी मंडळातून विव्हाजन करून जरंडी या नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या महसुली मंडळात समावेश करण्यात आला आहे.फर्दापूर,बहुलखेडा,सोयगाव आणि सावळदबारा या चार सज्जांचे विभाजन करण्यात येवून धनवट,उमरविहीरे,आमखेडा आणि नांदातांडा या चार नवीन तलाठी सज्जांचे निर्मिती करण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात आता २२ तलाठी सज्जांचे महसुली क्षेत्र झाल्याने आता नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या चारही सज्जांवर नवीन तलाठ्यांना कारभार तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याने या चारही तलाठी सज्जांचा नवीन कारभार कार्यान्वित करण्यात आला असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.

सोयगाव महसुली मंडळाचे विभाजन करून नव्याने तयार करण्यात आलेल्या जरंडी महसुली मंडक्लाचा कारभार तूर्तास प्रभारी मंडळ अधिकारी मधुकर धोंडकर यांना सोपविण्यात आलेला आहे.दरम्यान आगामी खरीप हंगामासाठी जरडी मंडळाला नव्याने पर्जन्यमापन केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.