औरंगाबादवरून पायी जाणाऱ्या मजुरांना दिला आधार ,तहसीलदार प्रवीण पांडे यांनी मध्यस्थी करून पोहचविले गावी

सोयगाव,दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
औरंगाबादवरून मध्यप्रदेशाकडे पायी निघालेल्या मजुरांचा मोर्चा तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या पाहणी दौर्यात निदर्शनास येताच त्यांची चौकशी करून त्यांना तातडीने बस उपलब्ध करून दिल्याचा गौरवास्पद उपक्रम तहसीलदार प्रवीण पांडे यांनी गुरुवारी चक्क चार तासातच राबविला.
लॉकडाऊनमध्ये मध्यप्रदेशातील औरंगाबादला अडकलेल्या मजुरांना गावी परत जाण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने या मजुरांनी औरंगाबादवरून मंगळवारी रात्री गावाकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला होता सदरील मजुरांचा ताफा तब्बल १२० कि.मी पायी चालत येवून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांना हा जथ्था आढळला नसल्याने सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी गुरुवारी फर्दापूरकडे कोविड-१९ च्या बाबतीत पाहणी दौऱ्यात या मजुरांचा जथ्था त्यांना आढळल्याने त्यांनी या मजुरांना हटकले असतांना या मजुरांनी त्यांची कहाणी त्यांनी सांगितल्यावरून तब्बल दोन दिवसापासून उपाशी हे पायी जाणारे मजूर असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या चौकशीत निष्पन्न झाल्यावरून त्यांनी तातडीने या पंधरा मजुरांच्या जेवणाची जागेवरच व्यवस्था करून घटनास्थळी आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणांना बोलावून त्यांची कोविड-१९ ची तपासणी करून सोयगाव आगारप्रमुख हिरालाल ठाकरे यांचेशी संपर्क साधून त्या मजुरांच्या ई-पासची तहसीलदार प्रवीण पांडे यांनी जागेवरच व्यवस्था केली व त्यांना सोयगाव आगाराच्या मोफत बससेवेतून मध्यप्रदेशाच्या सीमेपर्यंत(इच्छापूर)पर्यंत प्रवासाची वाट मोकळी करून दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.