आठवडा विशेष टीम―संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याला आटोक्यात आणण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.ठाकरे सरकार ह्या कठोर काळात यशस्वी होईल की नाही याची शाश्वती आज कोणीही देऊ शकत नाही.परंतु प्रशासन देखील कोरोना विरुद्ध लढाईत तितक्याच जोराने काम करत आहे.बीड जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्यावर लगाम घालण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ते निर्णय घेत आहे.एकीकडून धनंजय मुंडे तर एकीकडे पंकजा मुंडे असे चित्र राजकारणाच्या पटलावर आहे.धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत.ते बीड जिल्ह्याच पालकत्व कशाप्रकारे निभावतात याकडे लक्ष लागले आहे.परंतु जनतेतुन आता भाजपा सरकार असायला हवे होते असाही आवाज बाहेर पडायला लागला आहे त्यामुळे पुन्हा पंकजा मुंडे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील जनता पंकजाताई मुंडे यांच्या कार्यप्रणालीला जास्त भर देत आहे.आज पंकजाताई मुंडेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असायला हव्या होत्या असा आवाज आता सामान्य जनतेतुन यायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मंत्री असताना बीड जिल्ह्याचा कायापालट केला.बीड जिल्ह्याला आजपर्यंत चांगले रस्ते पाहायला मिळाले नव्हते ते रस्ते पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामुळे पाहायला मिळाले हे सत्य आपल्याला मानाव लागेल.पंकजाताई मुंडे यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून कार्य पाहताना बीड जिल्ह्यातील जनतेला कसल्याच प्रकारे वंचित ठेवले नाही.शेतकऱ्यांना कधी पाहायला न मिळेल एवढा पिकविमा त्यांनी मंत्री असताना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळवून दिला.शेतकऱ्यांचा कैवारी काय असतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले होते.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करणे ,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे पुण्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.याउलट भाजपा सरकार गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने बीड जिल्ह्यासाठी काही केले आहे का हा प्रश्न जनतेने स्वतःला विचारावा.
पंकजाताई मुंडेंसोबतच त्यांच्या बघिनी खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्याचे मूळ प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम केले आहे.पंकजा मुंडे यांचे बंधू समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत.त्यांच्याकडून देखील बीड जिल्ह्याचा विकास व्हावा या आशेवर सामान्य जनता आहे.