स्वाराती रूग्णालयात ३५% जागा रिक्त ; ५० डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठवू नका

स्वाभिमान संघटना आक्रमक ; अधिष्ठाता यांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वा.रा.ती. रूग्णालयातील डॉक्टरांच्या तब्बल ३५% जागा रिक्त असताना ५० डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न प्रशासन व आरोग्य विभाग करीत आहे.त्यामुळे ५० डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठवू नका या मागणीचे निवेदन स्वाभिमान संघटनाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम यांनी अधिष्ठाता यांना गुरूवार,दिनांक 28 मे रोजी दिले आहे.

महाराष्ट्र राज्यात विधायक : सामाजिक व अन्यायाविरूध्द लढणारी संघटना म्हणून स्वाभिमान संघटना ओळखली जाते.स्थाभिमान संघटनाचे आमदार नितेश नारायणरावजी राणे हे
संस्थापक अध्यक्ष आहेत.महाराष्ट्रात मनोजभैय्या कदम (महाराष्ट्र संपर्कप्रमुख, स्वाभिमान संघटना) यांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने अनेक लोकहिताची व जनसेवेची कामे केली आहेत.सध्या कोरोना विषाणु साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विषयांकडे स्वाभिमान संघटनाने लक्ष वेधले आहे.तो विषय म्हणजे स्वा.रा.ती.दवाखान्यातील ३५% जागा रिक्त असताना ५० डॉक्टर प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठविण्यात येत असलेबाबत.याप्रश्नी मनोजभैय्या कदम (महाराष्ट्र संपर्कप्रमुख, स्वाभिमान संघटना) यांनी स्वा.रा.ती.ग्रा.वै.रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले आहे.सदरील निवेदनात म्हटले आहे की,अधिष्ठाता स्वा.रा.ती.सरकारी दवाखान्यात आज रोजी जे शासनाकडुन ५० डॉक्टर हे प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे.तो रद्द करण्यात यावा.कारण,या दवाखान्यात अंबाजोगाई,परळी,माजलगाव,गंगाखेड,सोनपेठ, धारूर,केज,कळंब,रेणापूर अशा अनेक तालुक्यांमधून दररोज अत्यंत गरीब असे दोन ते अडीच हजार पेशंट रोज दवाखान्यात येवून छोट्यात छोटे व अंत्यत गंभीर आजारांवर उपचार घेतात.तरी यापुढेही सर्व जनतेची कोणतीच गैरसोय होऊ नये.तसेच त्यांच्यापुढे कोरोना सारखीच दुसऱ्या आजाराची चिंता उभी राहू नये व आज रोजी कोरोनासाठी दावाखान्यात बनवलेल्या २५० खाटांच्या वॉर्डची दुरावस्था होऊ नये यासाठी शासनाने त्वरीत ५० डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीची स्थगिती आणावी.मराठवाड्यातील बीड,लातूर,उस्मानाबाद, जालना,परभणी व नांदेड या जिल्हा व त्यांच्या तालुक्यातील जनतेच्या रोषास सामोरे जाऊ नये.हे होत असेल तर आम्ही जोरदार लढा उभा करू असा इशारा स्वाभिमान संघटनाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोजभैय्या कदम यांनी दिला आहे.सदरील निवेदनावर मनोजभैय्या कदम,भिमसेन आप्पा लोमटे,प्रमोद पोखरकर,प्रशांत चव्हाण, बाळासाहेव पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.