गोंदिया: रेल्वेच्या धडकेत झंझारीया कंपनी चौकीदाराचा मृत्यू

गोंदिया:बिंबिसार शहारे जिल्हा प्रतिनिधी―मुंडीकोटा येथील रेल्वे स्टेशन समोर घोगरा भीमनगर गेटच्या काही अंतरावर घोगरा पाटील टोला येथील गनराज शाहू सयाम वय अंदाजे 50 वर्ष, राहणार पाटीलटोला याचे रेल्वेने धडक दिल्याने रात्री 7.30 वाजताच्या सुमारास निधन झाले.

रेल्वे रुळाचे विस्तारित कार्य सुरू आहे. गणराज हा *झांझरिया* रेल्वे रूळ तयार करणाऱ्या कम्पनीत चौकीदार म्हणून कर्तव्य बजावत होता. त्याला संशयस्पद वाटल्याने तो ओरडत धावत होता. एवढ्यात त्याला रेलगाडीने धडक दिले. डोक्याला जबर दुखापत झाली. तो जागीच ठार झाला. तरी गणराजचे कर्तव्याचे *झांझरिया कंपनी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही.*

मृतक गणराज यास पत्नी, मुलगा,मुलगी, असा आप्त परिवार आहे.

त्याचे आकस्मिक निघून गेल्याने कुटुंबाचे चरितार्थ करावे कसे ? असा प्रश्न उद्भवणार आहे. याकडे मात्र झंझारीया कँपनीने पाठ फिरवली आहे. मृतकाचे घरी सध्या तणावाचे वातावरण आहे. कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी झंझारीया कंपनीकडे केली आहे.
पी. एस. आय.लोणकर. साहेब यांचे मार्गदर्शनात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पुढील. तपास हवालदार गोंडाने करीत आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.