वळद येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरण सुनियोजित ; जास्त वाळू उपसाला मोजके दंड

शेतकऱ्याच्या आत्महत्येला अनिल बिसेन दोषी

प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

पत्रकार परिषदेत बोपचे,तुरकर यांची मागणी

आमगाव:बिंबिसार शहारे―तालुक्यातील वळद येथील अवैध वाळू उत्खनन हा सुनियोजित पने आरोपींनी घडवून आणले आहे, या प्रकरणात मात्र निरपराध शेतकऱ्याचा जीव गेला यात याला अनिल बिसेन व शासकीय यंत्रणा दोषी असल्याचे आरोप नरेश बोपचे व नवीन तुरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली व प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
तालुक्यातील वळद येथील मालिकराम सीताराम पारधी व गजानन दादू पारधी यांच्या साजा क्रमांक२०गट क्रमांक२३/२आराजी०.५३हे आर जमिनीत वाळू अवैधपने उत्खनन करण्याचे नियोजित षडयंत्र रचून अनिल दासराम बिसेन यांनी शेतकऱ्याला भूलथापा देऊन वाळूचे उत्खनन केले.
५ मे २०२० पूर्वी पासून शासकिय नाला परिक्षेत्रातून वाहून आलेली वाळू शेतात असल्याची माहिती अनिल बिसेन याला मिळाली.यावेळी अनिल बिसेन यांनी शेत मालक गजानन पारधी यांना भूलथापा देत पैसाचे आमिष देऊन शेतातील वाळूचे अवैध उत्खनन केले व या वाळूची जप्तीची कार्यवाही तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने केली असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत नरेश बोपचे व नवीन तुरकर यांनी केले.तर या प्रकरणात अवैध वाळू उत्खनन बाबद तहसीलदार व मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना दिली परंतु त्यांनी वेळीच दखल घेतली नाही.त्यामुळे आरोपीने वाळूची अवैध उत्खनन सुरूच ठेवले व यात ५मे ला संगनमताने वाळूची जप्ती दाखवून त्याच दिवशी वाळूची लिलाव निविदा काढून त्याचे लिलाव १३ मे ला काढून घेतले तर सदर लिलावही अनिल बिसेन यांच्या नावाने सुनियोजितपने काढण्यात आले.
सदर वाळू उत्खननात गटातील लांबी१५,उंची१.१०,रुंदी१८,एकूण १०४ब्रास वाळू साठा उपसा करण्याची परवानगी असताना अधिक वाळू उपसा करण्यात आले.
याची माहिती आम्ही तहसीलदार यांना १७मे ला दिली असल्याची माहिती पुढे बोपचे व तुरकर यांनी दिली. तर अनिल बिसेन यांनी वाळू उपसा करताना हजारो ब्रास वाळूचे उत्खनन केले यात तहसीलदार यांनी चौकशी केली यात १०३८ब्रास वाळूची उत्खनन केले असल्याचे दिसून आले तसे पंचनामा केला. परंतु प्रत्यक्षात मात्र१०४ब्रास ची उत्खनन असल्याचा ठपका ठेवण्यात आले . अवैध वाळू उत्खनन बाबत शेतकऱ्याला दंड बसेल अशी माहिती काहींनी शेतकऱ्याला दिली . व प्रकरण दडपून घेऊ असे अनिल बिसेन याने वातावरण निर्माण केले.
अधिकारी प्रशासनाने हजारो ब्रास वाळूची अवैध उत्खनन असताना मात्र १०४ ब्रास चा दंड केले. या अवैध वाळू उपसा करणाऱ्या निविदादार अनिल बिसेन यावर निदान २कोटीचे दंड होणे ग्राह्य होते , परंतु रायल्टी पावतीचा घोळ ,वाहतूक करणारे वाहनांची संख्या, वाहन क्रमांक ,वेळ,दिनांक सर्वच घोळ वाळू चोरी प्रकरणांत दिसून येत वाळू उत्खननात प्रशासनच सापडलेल्याअसल्याने प्रकरण दडपाण्यात आले,मात्र यात निरपराध शेतकरी याला जीव गमवावा लागला.
सदर प्रकरणात आम्हाला गोवण्यासाठी अनिल बिसेन याने षडयंत्र रचले व आमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी मृतकाच्या कुटुंबियांना समोर करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा कट करण्यात येत आहे .
सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदन अर्ज शासनाला आम्ही केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.