पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा कोविड केअर सेंटर मधून आज १० जणांना.कोरोना उपचार पूर्ण करून सुट्टी देण्यात आली यात भडगाव मधील ९ व पाचोऱ्यातील एकाचा समावेश आहे. मात्र पाचोरा कोविड केअर सेंटर हे एका वेगळ्या अर्थाने चर्चेत आले असून ७ महिन्याच्या बालकापासून ते ७० वर्षीय वयोवृद्ध बाधितांवर यशस्वी उपचार करणारे केंद्र ठरले असुन याबद्दल सर्वत्र ‘समाधान’ व्यक्त केले जात आहे. यापूर्वी देखील पाचोरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमित साळुंखे यांनी राज्यात सर्वात प्रथम तालुकास्तरावर संशयीत कोरोना बधितांचे स्वब घेण्यास सुरुवात केल्याने कौतुकास पात्र ठरेल होते.त्यानंतर आता पुन्हा ७ महिन्याच्या बालकापासून ते ७० वर्षीय बाधित आजोबांवर यशस्वी उपचार करत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने आनंद निर्माण झाला आहे. उपचारात त्यांना विघ्नहर्ता कोविड केअरचे संचालक डॉ.भूषण मगर, व पाचोऱ्यातील अनेक खाजगी डॉक्टर्स यांची वेळोवेळी मोलाची मदत मिळाली आहे.
भडगाव शहरातील शनी चौक भागातील एका केवळ ७ महिन्यांच्या बालकाने कोरोनावर मात केल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला. आता पर्यंत पाचोरा येथील विघ्नहर्ता कोविड केअर सेंटर मध्ये यशस्वी उपचार करून अनेक बधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ.अमित साळुंखे डॉ.भूषण मगर , डॉ सुनील गवळी व होमियो पॅथिकतज्ञ डॉ. यशवंत पाटील यांच्यासह शहरातील विविध डॉक्टर्स या कोविड केअर सेंटर ला रुग्णसेवा देत आहेत.
तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ.किशोर पाटील,उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहासिलदार कैलास चावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकड़े, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व सर्वच अधिकाऱ्यांनी उत्तम समन्वय ठेवल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.