छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनाने राजकारणातील कुशल प्रशासक नेतृत्व हरपले― रामदास आठवले

मुंबई दि.२९:आठवडा विशेष टीम― छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिवंगत अजित जोगी यांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षात काम केले. आदिवासी वंचित मागासवर्गीयांसाठी झटणारे ज्येष्ठ नेते म्हणून राष्ट्रीय राजकारणात त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकारणातील कुशल प्रशासक नेतृत्व हरपले आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत अजित जोगी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

छत्तीसगड राज्याची स्थापना झाल्यानंतर छत्तीसगड चे पाहिले मुख्यमंत्री होण्याचा मान अजित जोगी यांना लाभला. ते राजकारणात येण्यापूर्वी आय एस एस अधिकारी होते. जिल्हा अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. जिल्हा अधिकारी पदाचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. ते राज्य सभा सदस्य होते. केंद्रीय मंत्री म्हणून ही त्यांनी काम केले. छत्तीसगड च्या राजकीय क्षेत्रात ते राजकारणातील पितामह ठरले. प्रदीर्घ अनुभवी राजकीय नेते; कुशल प्रशासक ; आदिवासी वंचित ग्रामीण गरीब श्रमिकांच्या मागासवर्गीयांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे ते नेते होते. माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. अजित जोगी यांच्या निधनाने केवळ छत्तीसगड राज्याचे नुकसान झालेले नसून संपूर्ण देशाच्या राजकीय पटलावरील एक कुशल अभ्यासू अनुभवी चमकणारा तारा निखळला आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post जळगाव: पाचोरा कोविड-१९ केयर सेंटर मधून १० जणांना डिस्चार्ज
Next post जालना जिल्ह्यात ७ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर ८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज