बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

जालना जिल्ह्यात ७ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर ८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना:आठवडा विशेष टीम― जालना जिल्ह्यात दि. 28 मे, 2020 रोजी रात्री उशिरा पुष्पक नगर, जालना येथील दोन व्यक्तींच्या स्वॅबचा, कानडी ता. मंठा येथील एक, नुतनवाडी ता. जालना येथील एक, डोलारा ता. परतुर येथील एक, मठ पिंपळगाव ता. अंबड येथील एक व जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील एक अशा एकुण सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह आला आहे.
तसेच वडगाव वखारी ता.जालना येथील तीन, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील एक, शिरनेर ता. अंबड येथील एक, नवीन जालना परिसरातील खासगी रुग्णालयातील दोन कर्मचारी, साईनाथ नगर, जालना येथील एक अशा एकुण आठ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन त्यांच्या स्वॅबचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज दि. 29 मे, 2020 रोजी रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
सध्या रुग्णालयात 81 व्यक्ती भरती आहेत, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 173 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2619 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -7 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -117 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2300, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -347, एकुण प्रलंबित नमुने -198, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-08, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-84, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2672 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 392 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-29, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -17, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-21, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -109 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-00, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-14 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -12 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-26, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-42, मॉडेल स्कुल मंठा-37, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर – 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-00 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 691 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 134 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 620 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 98 हजार 230 असा एकुण 3 लाख 25 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *