औरंगाबाद:सोयगाव तालुक्यात कापूस पिकांचा विमा मंजूर ,दुपार नंतर अचानक शेतकऱ्यांना संदेश प्राप्त

सोयगाव,दि.२९:आठवडा विशेष―
मराठवाड्यात कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्याला खरीप हंगाम २०१९-२० या वर्षातील कापूस पिकांचा विमा मंजूर झालेला असल्याने पहिल्या टप्प्यात शुक्रवारी दुपारनंतर २७ शेतकऱ्यांच्या खात्यावर चार लक्ष ६८ हजार ७५० रु इतकी रक्कम विम्यापोटी शुक्रवारी सायंकाळपर्यंत खात्यावर वर्ग झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार यांनी दिली.या विम्याच्या रक्कमेमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आगामी खरिपाच्या पेरण्यासाठी दिलासा मिळाला आहे.मात्र हेक्टरी केवळ १४,८४८ रु याप्रमाणे सोयगाव तालुक्यातील तीनही महसुली मंडळात रक्कम मंजूर झाली आहे.
कापूस लागवडीच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात खरीप हंगाम २०१९-२० या वर्षात २८७४३ हेक्टरवर कापूस पिकांची लागवड करण्यात आली होती.परंतु गुलाबी बोंडअळी आणि अवकाळीचं संकटात सापडलेल्या कपाशी पिकांचे मात्र चुकारे कमी आल्याने शेतकऱ्यांचे या नैसर्गिक संकटात मोठे नुकसान झाले होते,अचानक शुक्रवारी कापूस पिकांचा विमा मंजूर झाल्याने आगामी हंगामात शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्यासाठी आधार मिळाला आहे.खरिपाच्या २०१९-२० मधील आलेल्या संकटांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याच्या रक्कमेमुळे तारले आहे.अवकाळी पावसाच्या संकटामुळे सोयगाव तालुक्यातील सुमारे २२ हजार हेक्टर वरील १७७६० शेतकऱ्यांनी कपाशी पिकांचा विमा उतरविला होता.त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाच्या पोर्टलवरून थेट २७ शेतकऱ्यांच्या खात्यावर कपाशी पिकांच्या विम्याची चार लक्ष ६८ हजार ७५० इतकी रक्कम सायंकाळ पर्यंत वर्ग झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया सुरु राहील असेही शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांचे अचानक मोबाईल खणखणल्याने पिक कर्ज मंजूर झाले कि काय असा भास शेतकऱ्यांना मंजूर झाल्याने मोबाईलवर संदेश प्राप्त होताच शेतकऱ्यांनी बँके कडे आगेकूच केल्यावर संबंधित रक्कम हि कपाशी पिकांच्या विम्याची असल्याचे शेतकऱ्यांना कळाले.

जोखीमसत्र कमी लावल्याने हेक्टरी १४,८४८ रु इतकी रक्कम-

शासनाने खरीप हंगाम २०१९-२० पासून खरिपाच्या पिकविम्याचा निकष बदलाविल्याने पिक कापणी प्रयोगातून विमा संरक्षण प्रती हेक्टर उंबरठा उत्पाननपातळी पर्यंत असा निकष ठरविला असल्याने कापूस पिकांसाठी शंभर टक्के नुकसानीसाठी जोखीमस्तर ७० टक्के निकष ठरविण्यात आलेला असून यामध्ये हेक्टरी ४३ हजार रु इतकी रक्कम मिळते परंतु सोयगाव तालुक्याचा सरसगट जोखीमस्तर हा कमी लावल्या गेल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी १४ हजार ८४८ रु इतकीच रक्कम खात्यात मिळाली आहे.त्यामुळे नाराजीचा सूर पसरला आहे.
मका,सोयाबीन पाठोपाठ कपाशी पिकांनाही विमा मंजूर झालेला आहे.सोयगाव तालुक्याची खरीपाची अंतिम आणेवारी सरासरी ४७ टक्के इतकी होती.त्यामुळेच सोयगाव तालुक्याला कपाशी पिकांचा विमा मंजूर झालेला आहे.आधीच कपाशी विक्री करण्यासाठी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कपाशी पिकांच्या पिक विम्यातून भरीव मदत झाली असल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी वर्तविल्या असून अजूनही कोविड-१९ च्या संसर्गाच्या जिल्हाबंदीच्या नियमात अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री अभावी घरातच पडून आहे.त्यातच कपाशीला योग्य भाव नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर झाल्याने आधार मिळाला आहे.

१)सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने कापस्जी पिकांना अचानक पीकविमा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे,.या निर्णयामुले ऐन खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अचानक धनलाभ झाला आहे.त्यामुळे आगामी खरिपाच्या पेरण्याअस्थी आधार मिळाला आहे.
―प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव

२)सोयगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात कपाशी पिकांना २७ शेतकऱ्यांच्या खात्यावर चार लाख ६८ हजार ७५० रु इतकी रक्कम वर्ग झाली आहे.नवीन पिक कापणी प्रयोगाच्या निकषातून सोयगाव ला कपाशी पिकांचा विमा मंजूर झालेला आहे,टप्प्याटप्प्याने सर्वच शेतकऱ्यांना कापशी पिक विम्याची रक्कम मिळेल,त्यातून खरिपाच्या आगामी पेरण्यांना आधार झाला आहे.
―अरविंद टाकणखार
तालुका कृषी अधिकारी

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.