बीड: कळंब लगत केज तालुक्यातील बफर झोन काढून, परिस्थिती पूर्ववत– जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड दि.३०:आठवडा विशेष टीम― केज तालुक्याच्या लगत असलेल्या कळंब जि. उस्मानाबाद हद्यीमध्ये १५ मे २०२० रोजी कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला असल्यामुळे केज तालुक्यातील काही गावांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (0 (३) अन्वये पूर्णवेळ बंद करण्यात येऊन बफर झोन (Buffer Zone) जाहीर झाला व संचारबंदी लागू करण्यात आली होती.

केज तालुक्यातील मौ. सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुडी ब बोरगांव येथील बफर झोन (Buffer Zone) जाहीर करुन १४ दिवस पूर्ण झालेले आहेत तिथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे येथील बफर झोन (Buffer Zone) काढून टाकण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post शिक्षकांसाठी 'टीचर इनोव्हेशन अवार्ड' ; राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन ,सर्व शिक्षकांना अभिनव संधी
Next post अंबाजोगाई: संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी राणा चव्हाण यांची नियुक्ती