अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील काँग्रेस कार्यकर्ते राणा चव्हाण यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.राणा चव्हाण यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे शिफारशी वरून राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा दगडू चव्हाण यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी शनिवार,दि.23 मे 2020 रोजी नियुक्ती करण्यात आली.निवडीचे पञ चव्हाण यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.राणा चव्हाण हे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते म्हणून सर्वत्र ओळखले जातात.तसेच ते अंबाजोगाई युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष होते.तर सध्या ते मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आहेत.मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी अंबाजोगाईत काम सुरू केले.सर्वप्रथम दि.12 मे 2016 रोजी त्यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली.त्यानंतर ते राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष झाले व 4 सप्टेंबर 2019 पासून चव्हाण हे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य करीत आहेत.सामाजिक क्षेत्रांत विविध पदांवर कार्य करण्यासाठी आपणांस बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया राणा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या माध्यमातून व राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील गोरगरीब व गरजूंना शासनाची मदत व सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे राणा चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले.