सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात आठवडाभरापासून उन्हाची झळ वाढलेली असतांना तालुक्यात अचानक उकाडा वाढला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक स्वतः मोठी काळजी घेतांना आढळून येत आहे.
सोयगाव तालुक्यात आठवड्यापासून उन्हाची लाट आली आहे.खानदेशच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्याला जळगावच्या तापमानाची झळ सोसावी लागत आहे.राज्यात विक्रमी तापमानाची नोंद असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर सोयगाव तालुका आहे.त्यामुळे सोयगावातही विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत शनिवारपासून हवेतही उकाडा होत असल्याने तप्त हवा मिळत असल्याने सोयगाव तालुक्यात मोठा गोंधळ उडाला आहे त्यामुळे नागरिक बाहेर पडतांना डोक्यावर टोपी,गॉगल,रुमाल,छत्री,महिलांना स्कार्फ,यांच्घा वापर करतांना दिसून येत आहे.जनावरे सुद्धा झाडांची सावली शोधतांना दिसून येत आहे.अधून मधून ढग येत आहे.पण ते तात्पुरतेच त्यामुळे उन्हाच्या उकाड्याने असह्य झालेल्या नागरिकांना जून महिना कधी उजाडतो आणि पावूस केव्हा पडतो याचीच प्रतीक्षा तालुकावासीयांना लागून आहे.