सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता, शौचालय स्वच्छता, परिसर स्वच्छता, अन्नाची स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व या बाबतीत व्हॉट्सअपद्वारे जनजागृती करत आहे. त्यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले की, आजची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनीच स्वच्छते विषयी काळजी घेतली तर कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. जेथे घाण-दुर्गंधी, अस्वच्छता असते तेथेच रोगराई पसरते. रोगराई होवू नये म्हणून स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे. जेथे स्वच्छता असते तेथील आरोग्य नेहमी चांगले असते. स्वच्छते मुळे आपले आरोग्य निरोगी व शरीर सुदृढ राहते.