पैठण दि.३१:आदित्य✍ढाकणे―
खरंतर एक परिपक्व व्यक्ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी भुकेलेला नसतो.समाजातील परिपक्व व्यक्ती कुणीही असू शकतो. घरातील कर्ता व्यक्ती जसा स्वत:च्या आशा आकांक्षा बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी जीवनपटलावर झगडत असतो, त्यांचा सुखासाठी , आनंदी जीवनासाठी संघर्ष करत असतो . तो कुटुंब प्रमुख परीस्थितीनुसार घरात असो वा नसो ,त्याचं व्हिजन क्लिअर असतं. तसंच काहीसं असतं काही परिपक्व राजकीय नेत्यांचं !
आजकाल नेता म्हटलं की फक्त सत्तेसाठी आसुसलेलं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण खरंच सगळेच नेते सत्तेसाठी आसुसलेले असतात का ? खरंतर सत्तेत नसताना सुद्धा जो राजकीय नेता आपल्या जनतेचे मायबाप होऊन त्यांचा भल्याबुर्या काळात त्यांना कायम एक आधारवड म्हणून जगतो तोच खरा सत्ताधीश असेल, हे माझं व्यैयक्तिक मत ! सत्ता वा कसलंही पद नसताना कोरोनासारख्या महामारीत सुद्धा जनतेच्या मदतीसाठी त्यांचा मायबाप होऊन जमेल तसं स्वत:ला झोकून देताना मी पाहिलंय रणरागिणी ला . होय , तीच रणरागिणी आपल्या लाडक्या ताईसाहेब , पंकजाताई गोपीनाथ मुंडे !
कोरोनामुळे राज्यातच काय तर संपूर्ण जगामध्ये अंधकारमय वातावरण पसरलंय . महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी याचं राजकारण करायला लागलेत ( काही मोठ्या पदावर असणार्या मोजक्या व्यक्ती).अशा स्थितीत ताईसाहेबांसारख्या नेतृत्वाने असल्या राजकीय खेळींपासून दुर राहत कोरोनाच्या अंधारात गुरफटलेल्या मायबाप जनतेला शक्य तेवढी मदत करण्यात स्वत:ला बिझी करण्यातंच धन्यता मानलीय.मग ते ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी ताईसाहेब जाणिवतेने लढताना आपण अनुभवलंय . तेही सत्ता नसताना, शक्य तसं कामगारांशी संपर्कात राहून अडचणी समजून घेणं ,राज्य सरकारला जाब विचारून तात्काळ निर्णय घ्यायला भाग पाडणारं हे नेतृत्व. एवढंच नाही तर आज घेतलेली मराठवाडा पाणी परिषद ताईसाहेबांची दुरदृष्टी दाखवते.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या मार्फत ‘उत्थान’ अंतर्गत पंकजाताईंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंध महाराष्ट्रामध्ये मुंडेजीच्या संघर्ष योध्यांनी कोरोनाच्या काळात जनतेसाठी जे मदतकार्य राबवलं ते एका प्रतिष्ठानसाठी दैदिप्यमान आणि उल्लेखणीयंच ! सत्तेच्या खेळीपासून दुर राहून आदरणीय मोदींजीच्या आवाहनाला सज्ज राहत व मुख्यमंत्र्यांच्या योग्य निर्णयांचं स्वागत करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत ताईसाहेब जनतेसाठी मदतकार्यात किंचीतही कमी पडत नाहीत , मदतकार्य सुरूच आहे. शेवटी लोकनेत्याच्या लेकीने कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करण्याचा वसा घेतलेला आहे .
चाणक्य म्हणतात ‘ कोई भी व्यक्ती अपने कार्यो से महान होता है, जन्म से नही ‘ हेच मला पंकजाताईंबद्दल नक्की म्हणावं वाटतंय कारण साहेबांची लेक म्हणून जरी जन्म घेतला असला तरी एक मंत्री या नात्याने ताईसाहेबांनी जणू एक विकासगंगाच मराठवाड्यात आणलीय ,रस्ते महामार्ग,जलयुक्त शिवार, हक्काचा पिकविमा, ग्रामविकास च्या माध्यमातून केलेली कामे कितीतरी आहेत , त्यानुसार मला २०१४ च्या आधीचा मराठवाडा आणि आत्ताचा मराठवाडा ,फरक स्पष्ट जाणवतोय .
पण दुर्दैवाने २०१९ च्या विधानसभेत काही अनपेक्षीत कारणांमुळे पराभव स्विकारावा लागला आणि तेव्हापासून पक्षातीलच मोजक्या लोकांनी ताईसाबांविरोधात नीच पातळीचं राजकारण सुरू केलंय. एक महिला नेतृत्व असल्याचा फायदा तर ही राजकीय मंडळी पुरेपूर घेतीय .
अशा नीच लोकांना एवढंच सांगेल की, आदरणीय प्रमोदजी आणि मुंडेसाहेबांच्या विचारांतून वाढलेलं हे ‘पंकजा’ नावाचं फूल भाजपच्या मोजक्या मंडळींनी बनलेल्या चिखलातून ऊमलणार सुर्य किरणांच्या साक्षीने. आणि राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत सुध्दा पोहोचेल ! तेव्हा मुंडेत्वात वाढलेल्या प्रत्येक संघर्ष योध्याच्या संघर्षाचं चीज झालेलं असेल !