बीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

बीड जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न

बीड दि.०८: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी,गणेश महाडीक,प्रियंका पवार हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी दहा कामे सुरु करावीत, साप्ताहिक मजूर उपस्थितीची प्रगती पथावरील कामे,अपूर्ण असलेल्या विहीरी, निर्मल शौचालय, शौच खड्डे,अहिल्यादेवी सिंचन विहीरी, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेतंर्गत येणारी कामे,अपूर्ण पाणी पुरवठयाच्या विधंन विहीरी, सिंचन विहीरी, शेततळे, पारंपारिक साठयाचे नुतणीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, बोअरवेल ची पूर्णभरण कामे, रोप निर्मिती इत्यादी कामाचा आढावा घेतला.

मजूराची आधार नोंदणी, प्रत्येक मजूराचा केस रेकॉर्ड ठेवण्यात यावा, मजुरांना जॉब कार्ड देण्यात यावे,दुष्काळ योजनेवरील चालू असलेली कामे १०० टक्के पूर्ण करणे,कुशल-अकुशल कामे, जलयुक्त शिवार अंतर्गत निवडलेल्या २५६ गावांपैकी पूर्ण झालेल्या गावांची जल परिपूर्णता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत प्रथम टप्यातील कामे याची माहिती संगणक प्रात्यक्षिकाद्वारे जाणून घेतली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना अनुदान वाटपाबाबत, अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकीवर कारवाई करावी, निवडणूक विषयी प्रलंबित डीएसईएस,२, मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सुविधा,मतदार यादी सुधारणा, डिजीटल सातबारा संगणकीकरणाची कामे, ईस्कॅनिंग अभिलेखे, डिजीटल सातबारे फेरफार २५ फेब्रुवारी पर्यंत विविध प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना श्री. सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.