क्राईमबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यहेल्थ

गाजलेल्या बीडच्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील डॉ.सुदाम मुंडेंचा दुपारनंतर निकाल

स्त्रीभ्रृण हत्याप्रकरणात तीन दिवसांपासुन सुरू असलेली सुनावणी पूर्ण

बीड (प्रतिनिधी) दि.०८:- स्त्रीभ्रूण हत्येसारखं क्रूरकर्म करणाऱ्या बीडच्या आरोपी मुंडे दाम्पत्याचा निकाल आज लागणार आहे. बीडचं जिल्हा न्यायालय आज या प्रकरणी निकाल देणार आहे. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते.त्यापैकी जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे आज उर्वरित १६ जणांसंदर्भात निकाल येणार आहे.गेल्या तीन दिवसांपासून याप्रकरणाची सुनावणी सुरू होती. ती पुर्ण झाली असून आज दुपारनंतर डॉ.सुदाम मुंडेंचा फैसला होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.२०१२ मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता.यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन ३-, सेक्शन ९,सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन ४ आणि ६ चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला आहे.२०१५ मध्ये परळी कोर्टाने मुंडे दाम्पत्याला वेगवेगळ्या आठ कलमांखाली प्रत्येकी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती, ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती.म्हणजे एकूण ४८ महिन्याची शिक्षा सध्या सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे भोगत आहेत दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.५ किलोमीटरवरचं सारडगाव...प्राथमिक शिक्षणात चुणूक दाखवून सुदाम मुंडेंनी औरंगाबादमधून डॉक्टरकीची पदवी मिळवली आणि परळीच्या सुभाष चौकात छोटसं क्लिनिक सुरु केलं.सोनोग्राफी मशिनमधून गर्भ पाहायचा आणि मुलींची गर्भातच हत्या करुन सुदाम मुंडेकडे प्रचंड बरकत आली. त्यातून परळीच्या बस स्थानकांसमोर पाच मजली टोलेजंग हॉस्पिटल उभं राहिलं.परळी परिसरात मुंडे दाम्पत्याने थोडीफार नव्हे ३५० एकर जमीन वेगवेगळ्या नातलगांच्या नावावर खरेदी केल्याची चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटक, गुजरातसह सांगली, साताऱ्यातूनही सुदाम मुंडेकडे दररोज ५० पेशंट यायचे. फी होती प्रती पेशंट
२० हजार रुपये. पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे सुदाम
मुंडे यांनी चक्क प्रिस्क्रीप्शन प्रिंट करुन घेतली होती.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.