सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
खरीप हंगामाच्या ४३ हजार लागवडी क्षेत्रापैकी २८ हजार हेक्टर वर खरिपाच्या पूर्वतयारीची कामे आटोपली असून आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्यांचे वेध लागले असल्याने पावसाची प्रतीक्षा लागून आहे.सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामासाठी ४३ हजार क्षेत्र लागवडी योग्य असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार यांनी दिली.
खरीप हंगाम २०२०-२१ साठीची पूर्वतयारी सोयगाव तालुक्यात २८ हजार हेक्टर वर पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रावरील पूर्वतयारीची लगभग सुरु आहे.आठवडाभरापासून सोयगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला होता.मागील वर्षीच्या खरीप हंगामात ४३ हजार हेक्टरपैकी ४२४३४ हेक्टर वर खरिपाच्या तब्बल ९९ टक्के पेरण्या झाल्या होत्या,यामध्ये कपाशी पाठोपाठ मक्याचा पेरा वाढला असतांना या वर्षीही कपाशी आणि मक्याच्या पेरयात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.सोयगाव तालुक्यात कपाशी लागवडीत कोरडवाहू आणि बागायती या दोन प्रकारात लागवड करण्यात येते,यंदाच्या खरीप हंगामात हंगामिपूर्व कपाशी लागवडीला प्रारंभ करण्यात आलेला आहे.कोविड -१९ आणि गुलाबी बोंडअलींची साखळी तोडण्यासाठी शासन पातळीवरून शेतकऱ्यांना उशिरा बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी लागवडीच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली होती त्यामुळे कपाशी पिकांची १०६ टक्के पेरण्या झाल्या होत्या,कपाशी पाठोपाठ मका,मुग,तूर,ज्वारी,बाजरी,उडीद,सोयाबीन आदी पिकांच्याही पावूस झाल्यावर पेरण्या करण्यात आल्या होत्या.मक्याच्या ६२ टक्के तर तूर,मुग आणि उडीद पिकांच्या ८५ टक्के पेरण्या करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
————————
यंदाच्या हंगामावर मात्र टोळधाडचे संकट येण्याची शक्यता असल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरण्या आधीच चिंता वाढली आहे.सोयगाव तालुका हा डोंगराळ भागाच्या भोवताली आहे.हिरवळीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर टोळधाड येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे तालुका कृषी विभागाकडून खरिपाच्या पेरण्या आधीच सोयगाव तालुक्यात जनजागृती वाढविली आहे.शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.मात्र टोळधाडचे संकट सोयगाव तालुक्यात येण्याआधीच उपाय योजनांची लगभग शासनपातळी वर हाती घेण्यात आली आहे.