औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूर तालुक्यातील 114 ग्राम पंचायती व 224 गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईट या द्रावणाची फवारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये कोरोनो बाबत जनजागृती करण्यात आली असल्याचे गट विकास अधिकारी विजय परदेशी यांनी कळविले आहे.
ग्रामस्तरावर ग्राम सेवक, ग्रामविकास अधिकारी यांचेमार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना कोरोनो या संसर्गजन्य रोगाबाबत प्रक्षिक्षण देण्यात आले. पुढे या प्रशिक्षणार्थिनी कोरोनो या संसर्गजन्य रोगाबाबत ग्रामस्थांनी कसा पद्धतीने काळजी घ्यावयाची, नियमित मास्क घालणे, वारंवार हात धुणे, परिसर स्वच्छ ठेवणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, उघड्यावर थुंकू नये,खोकलताना, शिंकताना हात रुमालाचा वापर करणे,आदी बाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केलेली आहे. गावांच्या सीमेवर चेकपोस्ट तयार केलेल्या आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद घेवून वैद्यकीय तपासणी करण्यात येते. संशयित असल्यास त्यांच्या विलगीकरण व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विस्तार अधिकारी व शाखा अभियंते यांचे गण स्तरांवर सनियंत्रण म्हणून नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील कोरोना बाबत केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषेदेचे अध्यक्षा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायत वाळूज व फुलशिवारा येथे भेट देवून पाहणी करून मार्गदर्शन केले असल्याचे पंचायत समिती गंगापूर च्या वतीने कळविण्यात आले.