औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे अनेक योग वर्ग, योग सत्र बंद आहेत. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. २१ जून या जागतिक दिनाचे औचित्य साधून विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी च्या वतीने 1 जून ते 20 जून पर्यत योग सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संचलित या योग सत्र कार्यक्रमात योगासने व प्राणायम शिकविले जाते. २१ जून या योगदिनी कार्यक्रमाची सांगता होईल. सत्र व कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. योग दिनाच्या दिवशी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा मा. निवेदिता भिडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. सदर सत्र हे निशुल्क आहे. इच्छुकांनी या सत्रासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScnxGeutVRP8Vvly2G9uvpMbs-2oy0qjC8fsLI9nK7TY4yTZA/viewform?usp=sf_link या लिंक वर नोंदणी करावी.