विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची सत्याग्रहाला पाठींबा देत विवेक पंडितांना प्रकृतीच्या कारणाने उपोषण सोडण्याची विनंती
आदिवासींच्या हक्कांसाठी आम्ही श्रमजीवीसोबत-देवेंद्र फडणवीस
फडणविस यांनी दाखवलेल्या प्रेमाबाबद्दल पंडितांनी व्यक्त केली कृतज्ञता
ठाणे दि.०१:आठवडा विशेष टीम― श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, विद्युल्लता पंडित आणि श्रमजीवी अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्यासह 19 तालुक्यातील श्रमजीवी कार्यकर्त्यांनी काल (दि.31) पासून अन्नसत्याग्रह सुरू केला आहे. आज या सत्याग्रहींची विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली. श्रमजीवीच्या मागण्या ह्या सरकारची संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगत आदिवासींच्या न्याय्य हक्काच्या या लढ्यात आम्ही श्रमजीवी संघटनेच्या सोबत आहोत असे त्यांनी सांगितले. याबाबत फडणवीस आणि दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन निर्णय घेण्याची मागणी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळजी बद्दल विवेक पंडित यांनी कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपोषणाबत दिलेल्या पत्राबाबतही आभार व्यक्त केले.
आता उपोषणाबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही पंडित यांनी आभार मानले, याबात मागण्यांची पूर्तता झाल्याबाबतचे पत्र मिळताच हे उपोषण संपविले जाईल असे पंडित यांनी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे यांनीही यावेळी सत्याग्रहाला पाठींबा देत शुभेच्छा दिल्या.