ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणसामाजिक

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शकील सैफी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करा― केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

नवी दिल्ली दि.०१:आठवडा विशेष टीम― रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडी चे अध्यक्ष शकील सैफी यांच्या दिल्लीतील नांगलोई निहाल विहार येथील घरावर अज्ञात तीन व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार करून शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शकील सैफी बचावले असून त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या पायावर तीन गोळ्या लागून गंभीर जखमी झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांचा कसून शोध घेऊन त्वरीत अटक कारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

आज त्यांनी हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच शकील सैफी यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर असल्याचे सांगत धीर दिला.

रिपाइं( आठवले) पक्षात अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत शकील सैफी उत्कृष्ट समाजकार्य करीत आहेत. मात्र काल अज्ञात हल्लेखोरांनी शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा उद्देशाने त्यांच्या घरावर गोळीबार केला . या प्रकरणी येथील डिसीपी सागर यांची भेट घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.