क्राईमपरळी तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यहेल्थ

बीड - अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे यांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अन्य ११ जणांची निर्दोष मुक्तता

बीड दि.०८ (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील परळी मध्ये २०१२ साली राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही याप्रकरणी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र अन्य ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली.स्त्री भृणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act आणि Maternity Benefit Act कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले आहेत.स.न.२०१२ च्या मे महिन्यात विजयमला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या दवाखान्यात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा समोर आला होता.दरम्यान, गेली साडेसहा वर्षे डॉ सुदाम मुंडे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात होते त्यामुळे तो कालावधी वजा करून उर्वरित शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. त्यांची पत्नी सरस्वती मुंडे जामीनावर बाहेर होती. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते. त्यापैकी एक डॉ. राहुल कोल्हे याचा अपघाती मृत्यू झाला.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.