औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव शहर ग्रामीणतील लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी

सोयगांव दि. २१:आठवडा विशेष टीम― सोयगाव शहरातील व ग्रामीण भागातील मंगळवारचा लाँकडाउन शभंर टक्के यशस्वी करण्यात आला, औरंगाबाद येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व छोटा मोठ्या गावात लाँकडाउन यशस्वी करण्यात येत असताना गेली एक महिन्या पासुन तालुक्यातील गावामध्ये लाँकडाउनच्या नियमांचे पालन करत तालुक्यातील नागरिकांनी बरे पैकी प्रशासनाला सहकार्य करीत लाँकटाऊन पाळत आहे, मात्र पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी शहरातील अतिअवश्यक सेवा देण्यात येणारे व्यापारी (किराना दुकानदार भाजीपाला दुकानदार)यांना पुर्वसुचना देत मंगळवारी सकाळी सात वाजे पासुन तर रात्रीच्या आठ वाजे पर्यंत शंभर टक्के लाँकडाउन करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी शंभर टक्के लाँकडाउन करुन सहकार्य केले ,शहरातील सर्व चौकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, ठाणे आमलदार संतोष पाईगराव, मंगलसिग लोदवाल,सिताराम घुगे,सागर गायकवाड, रविंद्र तायडे,विकास लोखंडे,दिलीप तडवी,शिवदास गोपाल,संदीप चव्हाण, राहुल दामधर,भुषण चौधरी, तितरे,महिला पोलीस कर्मचारी कविता मिस्त्री, रत्नमाला,होमगार्ड बापु लव्हाळे, गजानन गोतमारे, अमोल नेरपगारे,अदिसह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला,शहरामध्ये लाँकडाउन काळात टायगर म्हणून मोटारसायकल वर फिरणारे नागरिकानच्या 70 गाड्यावर दंडात्मक कार्यवाही करुन घरीच राहण्याचा सल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दिला आहे.

Back to top button