महाराष्ट्र राज्यसामाजिक

शिक्षक भारतीचा ९ फेब्रुवारीला मुंबईला मोर्चा

राज्यसमनव्य समितीचा मोर्चाला पाठिंबा राज्यसमनव्यक किशोर पाटील कुंझरकर व मित्र परिवार रात्री रवाना

प्रतिनिधी दि.०८: उद्या शनिवार दि. ९ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११ वा.दादर स्टेशन (पूर्व), स्वामीनारायण मंदिर ते कामगार मैदान, केईएम हॉस्पिटल जवळ, परळ शिक्षक भारती संघटनेचा शैक्षणिक प्रलंबीत मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.सदरील मागण्या सर्वच शिक्षक व शिक्षक संघटना च्या हिताच्या व अजिंड्यावर असल्याने राज्य शिक्षक संघटना राज्यसमनव्यय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांचे परवानगीने चर्चे अंति राज्यसमनव्यक तथा राज्यप्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी सक्रिय सहभागाचे सर्वाना आवाहन केले आहे राज्यभरातून व जळगाव जिल्ह्यातुन मोठ्यासंख्येने शिक्षकांनी मुंबई कडे कूच केली आहे .शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील यांच्या आजच्या मोर्चासाठी राज्यसमनव्य समिती राज्यसमनव्यक किशोर पाटील कुंझरकर व मित्रपरिवार मुंबईला रात्री रवानाझाले

आंदोलनातील मागण्या-
∎ सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.यासाठी राज्यसमनव्या समिती व राज्यसमनव्यक किशोर पाटील कुंझरकर सतत जुनीपेन्शन हक्क संघटनेसोबत आहेत
∎ विनाअनुदानित शाळा, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज आणि आयटीआय यांना १०० टक्के अनुदान द्या.राज्यात शासनाच्या ,आदर्श शिक्षकांना पूर्ववत दोन वेतनवाढ व राष्ट्रीय पुरस्कार समकक्ष सवलती मिळाव्यात जर राष्ट्रीय पुरस्कार साठी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पात्र समजत नाही कारण दोन्हीं पुरस्कार समकक्ष असल्याचे कारण देतात तर दोन्हीच्या सवलतीत जमीन-अस्मानाचा फरक का? राष्ट्रीय प्रमाणे राज्य पुरस्कार प्राप्त सर्वाना रेल्वे बस सवलत मिळावी ही मागणीचा किशोर पाटील कुंझरकर यांनी जोर लावला असून राज्य आदर्श शिक्षक संघटना द्वारा राज्याध्यक्ष नात्याने किशोर पाटील कुंझरकर यांनी शासनाकडे व आमदार कपिल पाटील यांच्याकडे जोर लावला आहे तसेच
∎ वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्रह्य धरावी.
∎ अंगणवाडी ताईंना पूर्व प्रार्थमिक शिक्षकाचा दर्जा देऊन वेतन द्या.
∎ केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करा. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा.
∎ विनाअट वरिष्ठ व निवडश्रेणी द्या. २३/१० चा जीआर रद्द करा.
∎ शिक्षकांना अतिरिक्त करणारा २८ ऑगस्ट २०१५ व ७ ऑक्टोबर २०१५ चे जीआर रद्द करुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या मागणीनुसार करावे.
∎ डी. एड. बी. एड. भरती सुरु करुन राज्यातील शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.
∎ नोकर कपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण बंद करा. सरकारी व निमसरकारी नोकर भरती सुरु करा.
∎ स्वयंअर्थशासित शाळा धोरण आणि शिक्षणाचे कंपनीकरण बंद करा.
∎ कला, क्रीडा शिक्षकांची पदे पुनर्स्थापित करा. पूर्णवेळ ग्रंथपाल नेमा.
∎ २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रद्द केलेल्या मान्यता पूर्ववत करुन वेतन सुरु करा.
∎ अंशकालीन निदेशक / अतिथी निदेशक कला, क्रीडा व कार्यानुभव यांना कायम स्वरुपी नियुक्ती व वेतन श्रेणी लागू करा.
∎ मानसेवी शिक्षकांना कायम करा. मानधन नको, वेतन द्या.
∎ शाळा, महाविद्यालयातील आयसीटी, आयटी शिक्षकांना पूर्णवेळ वेतन द्या.
∎ पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद करु नका. दहावीचे २० टक्के अंतर्गत गुण बंद करु नका.
∎ बदली प्रक्रीयेत सुलभता आणा. पती-पत्नींना एकत्र आणा.
∎ राज्यातील सर्व शाळांना मोफत वीज आणि आरटीईप्रमाणे सर्व भौतिक सुविधा द्या.
∎ शाळांमधील स्वयंपाकी मदतनीसांना किमान वेतन द्या.
∎ सावित्रीबाई फुले-फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना त्वरीत लागू करा.
∎ शिक्षकेतर कर्मचारी, सफाईकामगार आणि महिला सुरक्षा रक्षक त्वरीत नेमा.
∎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध जाहीर करुन भरती सुरु करा.
∎ शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत थेट भरती करा.
∎ सर्व दिव्यांग स्पेशल स्कूल्स्ना विशेष अनुदान द्या. आरटीई लागू करा.
∎ मुख्याध्यापकांना केंद्रीय विद्यालयाप्रमाणे स्वतंत्र वेतनश्रेणी द्या.
∎ रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज पूर्ववत सुरु करा.
∎ वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार १० टक्के द्या.
∎ ऑनलाईन कामांचे आऊटसोर्सिंग करा. बीएलओ ड्युटी रद्द करा.
∎ ज्युनिअर कॉलेजमधील पायाभूत पदांना अनुदान देऊन तत्काळ पगार सुरु करा.
∎ विद्यार्थ्यांच्या सर्व शिष्यवृत्या वेळेत द्या. मोफत गणवेश वाटप करा.
∎ कमी पटसंख्येच्या शाळा / अंगणवाडी शाळा बंद करु नयेत.
∎ अनुदानित शाळा/ज्युनिअर मधील विनाअनुदानित तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना रिक्त अनुदानीत पदावर तात्काळ मान्यता द्या.
▪सहाव्या वेतन आयोगातील २ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीत नियमित वेतन श्रेणीत आलेल्या शिक्षकांचे वेतनातील तफावत दुर करणे.
∎ २०१२ नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता काम करणाऱ्या ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात याव्यात.
∎ शालार्थ आयडी नोंदणीचे काम विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे द्यावेयासह अनेक मागण्या आदरणीय कपिल पाटील यांनी घेतले असून राज्यातील आदर्श शिक्षक व इतर संघटना देखील सहभागी होतील असे राज्यसमनव्य समितीचचे राज्यसमनव्यक तथा राज्यप्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी आज दि 8 रोजी मित्रपरिवार शेख शरीफ शेख सबदार एरंडोल विनोद पाटील शाळा हिरापूर प्रवीण भिवंदास पाटील नागाव रवींद्र बुधा पाटील जगधनवस्ती देविदास पाटील संजू वंजारी पारोळा ज्ञानेश्वर पाटील अमळनेर ईश्वर धोबीपारोळा प्रवीण पवारलोणी युवराज चौधरी कसोदाआदींसह जिल्ह्यातील चाळीसगाव जामनेर यावल रावेर आदी ठिकाणी येणाऱ्या शेकडो शिक्षक मित्र परिवार सह एरंडोल येथून जातानाम्हटले शासनाने आता शिक्षकांना लवकरच मागणी पूर्ण करून साथ देण्याची गरजही राज्य राज्यसमनवय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे राज्यसमनव्यक राज्यप्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष अरुण जाधव उर्दु शिक्षक संघटना राज्याध्यक्ष फारुकी ,अनिल लोखंडे जुनी पेन्शन चे वितेश खांडेकर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, सोमनाथ पाटील आदींनी व्यक्त केली.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.