बीड दि.०१:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश वाघिरा २५-१५ मधुन केलेल्या रस्त्याचे २ महिन्यातच तिनतेरा वाजले, ग्रामस्थांची मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मार्फत लेखी तक्रार,कारवाईची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की ,लिंबागणेश ते वाघिरा मुळेवस्ति, वायभटवस्ति, काळेवाडी मार्गे २ महीन्यापुर्वी २५-१५ मधुन केलेला २३ लाख रुपये किंमतीचा रस्ता पावसाळ्यापूर्वी उखडला असुन त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.तसेच साईड पट्टी शेजारील काळ्या मातीनेच भरली असून ब-याच ठिकाणी साईडपट्टी भरलीच नाही.
मध्येच अर्धवट रस्ता सोडून दिला –अभिजित गायकवाड
निकृष्ट दर्जाचे काम करत असताना अभिजित गायकवाड यांनी चांगले काम करण्याची विनंती केली असता मधेच काम सोडून दिले ,माझे घर आणि शेत वगळता इतर ठिकाणी रस्ता केला आहे.
थातुरमातुर काम केलंय – अनिल मुळे , कल्याण मुळे
रस्त्याला ,पंखे शेजारील काळ्या मातीचे काही ठिकाणी तर काही ठिकाणी भरलेच नाहीत, ऊन्हाळ्यात सिमेंट रस्ता करताना पाणीच मारले नाही , कुणीही सरकारी अधिकारी काम बघायला आला नाही, २ महीन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश ता.जि.बीड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला होता
डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुले व महिलांनी मांजरसूंभा ते पाटोदा राज्यमार्ग भालचंद्र महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.तत्कालिन महिला व बाल कल्याण, तथा ग्रामविकास तथा पालकमंत्री बीड ना.पंकजाताई मुंडे यांनी , दूधधारक , भाजीपाला विक्रेते, आजारी रूग्णाला खांद्यावर उचलून दोन किलोमीटर चालत तसेच शाळकरी मुले चिखल तुडवीत शाळेत जात आहेत ही बातमी विविध दैनिकातून प्रसिद्ध झाल्यानंतर निधी मंजूर करून वितरीत केला.परंतु ग्रामपंचायतनेच बोगस रस्ता केला त्यामुळे कुंपनानेच शेत खाल्ले अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी अशी लेखी तक्रार ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड , विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत दिली आहे.