अहमदनगर: आणखी ०३ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज ,जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३

अहमदनगर दि.०१:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी त्यांना निरोप देऊन पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होत असून नागरिकांनी मुळात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *