सोयगाव,दि.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसाठी सोयगावला ऑक्सिजन पुरवठा यंत्रे दाखल झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर कसबे यांनी दिली आहे.
सोयगाव शहरात कोरोना नियंत्रणासाठी तालुका आरोग्य विभागाने कंबर कसली असतांना मात्र सोयगावात कोरोना संसर्गाचा शिरकाव झालेला नसून सोयगावात एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याची डॉ,शंकर कसबे यांनी सांगितले,परजिल्ह्यातून आणि परराज्यातून आलेल्या सोयगावात आलेल्या १५७७ जणांची तपासणी करून त्यापैकी होमकोरोटाइन झालेल्या १४२३ जणांचा कालावधी संपला असून कोरोटाईन मध्ये सोयगावात केवळ १५४ जण आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली असून सोयगावातून कोरोना चा शिक्का हद्दपार झाल्याची स्थिती आहे.कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांच्या नियंत्रणाखाली डॉ.केतन काळे,डॉ.शिल्पा देशमुख,अधिपरिचारिका शीतल चौधरी,अयोध्या ठोंबरे,किरण पवार,चेतन वाकलकर आदींच्या पथकांनी पुढाकार घेतल्याने सोयगाव शहर कोरोनामुक्त झाल्याचे डॉ.शंकर कसबे यांनी सांगितले.