आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रांना कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीसह अटी व शर्तीवर सुरु करण्यास परवानगी – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड दि.१:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्र कन्टेनमेंट झोन व बफर झोन (Containment Zone And Buffer Zone वगळता) यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या सेवांसाठी बोटांचे ठसे मशीनवर घ्यावयाचे आहेत अशा सेवा इतर सर्व सेवा सामाजिक अंतर तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणीस करून अटी व शर्तीवर सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड १९) या संसर्ग प्रादुर्भाव वाढण्याची शक्यतेमुळे ग्राहकांच्या स्तरावरील बोटांचे ठसे मशीनवर घेणे आवश्यक असेल अशा सेवा चालवण्यास प्रतिबंध होते.
आपले सरकार सेवा केंद्र चालक व आधार केंद्र चालक यांनी घ्यावयाची खबरदारी
१. आपले सरकार सेवा केंद्र चालक व आधार केंद्रातील सामग्री /उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण घेणे आवश्यक आहे.
२. केंद्र चालक यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. उदा.वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे इत्यादी
३. केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर व चालक यांनी नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
४. केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. फक्त फोटो काढते वेळी मास्क काढणेस परवानगी द्यावी.
५. आधार केंद्र चालकांनी बायोमेट्रिक उपकरणे स्वच्छ व निजतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.
६. केंद्र चालक / ऑपरेटर यांचे टेबल व नागरिकांमध्ये शारीरिक अंतर किमान १ मीटर सुनिश्चित करून गर्दी टाळावी. तसेच रांगा लावतांना प्रत्येकांमध्ये किमान ६ फुट अंतर राहील अशा खुणा जमीनीवर करुन घ्याव्यात.
७. नागरिकांचे दोन्ही हात साबणाने किमान २० सेकंद घासून नंतर स्वच्छ पाण्याने धुवूनच बोटांचे ठसे घ्यावे. अशा प्रत्येक वापरानंतर बोटांचे ठसे घेणारे यंत्र साबणाच्या पाण्याने सुरक्षितपणे स्वच्छ करावे. यासाठी सॅनीटायझरचा वापर केल्यास हरकत नाही.
८. ज्या नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, सर्दी,डोकेदुखी व श्वसनास त्रास अथया कोरोना सदृश्य लक्षणे असतील अश्या नागरिकांनी केंद्रात न येण्याबाबतचे पत्रक दर्शनी भागात लावावेत.
९. शासनाने निश्चित केलेले सेवा वितरण विषयक दर नमूद असलेले फलक दर्शनी भागास लावावेत.
१०. केंद्र चालक व ऑपरेटर यांनी कोरोना प्रतिबंधित / प्रादुर्भाव झालेल्या भागातून प्रवास टाळावा.
११.कन्टेनमेंट झोन मध्ये असलेल्या गावातील केंद्रे बंद राहतील व सदरील कन्टेनमेंट झोन रद्द केल्यावर सदर केंद्र सुरु करता येतील.
१२. कुठल्याही प्रकारचे शिबीर आयोजित करू नये.
या नियमांचे उल्लंघन झालेले निदर्शनास आल्यास केंद्र चालक , ऑपरेटर हे शिक्षेत पात्र राहतील. असे निर्देश देऊन सर्व संबंधितानी तात्काळ कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक का १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.