कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहाच्या वतीने 7777 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी सुपूर्द

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
परळी शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना सुविधा व्हावी म्हणून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहाच्या वतीने 7777 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळ परिस्थितीत आर्थिक द़ृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवुन त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यात जेवणासाठी येणार्‍या खर्चापैकी शेतकर्‍यांकडून फक्त 10 रूपये तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करते.19 एप्रिल रोजी या ठिकाणी शिवभोजनाची मान्यता मिळाली आहे. याव्दारे पाच रूपयात भोजनाची व्यवस्था गरीब व गरजुंना करण्यात आली आहे. सामाजिक बंधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7777 इतका मदतनिधी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, तहसीलदार डॉ.विपीन पाटील, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर यांच्याकडे बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगर परिषदचे गटनेते वाल्मिक आण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ यांच्या उपस्थिती मध्ये स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहाचे व्यवस्थापक व श्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे यांनी हा मदतनिधी सुपूर्द केला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.