गोंदिया दि.०२:बिंबिसार शहारे― मागील काही दिवसात जिल्ह्यात सर्वच भागात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असतानाच जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी चे आदेश लागू करण्यात आले होते तरीसुद्धा काही मातब्बर नागरिक संचारबंदी चे नियम धाब्यावर बसवतांना दिसून येत आहेत.
दिनांक ३०/०५/२०२० ला जिल्ह्यात विविध ठिकाणी कलम १८८ अंतर्गत गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा, पोलीस स्टेशन रामनगर येथे एक गुन्ह्याची नोंद, पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे एक गुन्हा नोंद, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर दिनांक ३१/०५/२०२० ला कलम १८८ अंतर्गत केशोरी पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले, पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे दोन गुन्हे, तर डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तब्बल चार गुन्ह्यांची नोंद अशा मातब्बर नागरिकांवर गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल तेरा गुन्हे दाखल करण्यात आले.