औरंगाबाद दि.०२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील पोलीस कर्मचाऱ्यांची सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत तपासणी करण्यात आली तर पैठण तालुक्यातील सर्व घरांचे १०० टक्के सर्वेक्षण करण्यात आले असून लोकांची आरोग्य तपासणीही करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांना एन ९५ मास्क व sanitizer चा मुबलक पुरवठा करण्यात आला असून प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३ Layer मास्क व Face Shield चा पुरवठा करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात कोरोना आजाराच्या उपचार पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील संशयित रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र स्तरावर तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यातच रुग्ण positive आल्यास त्याचा High risk contacts चे थ्रोट स्वाब उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे घेतले जातात तर कमी, मध्यम रुग्णावर तालुका स्तरावरील उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात त्याच्यांवर उपचार करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तर रुग्ण गंभीर असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय किंवा सामान्य रुग्णालय औरंगाबाद येथे पाठविले जाते. तसेच positive रुग्णांच्या कंटेनमेंट कार्यवाही संबधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येत असून आज कोविड १९ च्या सर्वेक्षनासाठी दि १/६/२०२० रोजी एकूण १०९ टीम कार्यरत करण्यात आलेल्या असून त्यांनी ४०२२ घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये आज एकूण ६७६ रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आलेली आहे. आज एकूण १८ जणांचे स्वाब घेण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आशा व अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत कोरोना आजाराबाबत दररोज माहिती देण्यात येत असून त्यापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती घरोघरी जावून तसेच हॅंडबिल्स वाटप करून देण्यात येत आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे.