सोयगाव दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव शहरात कोरोना संसर्गाला यशस्वीरीत्या रोखण्यासाठी संघर्ष केलेल्या पोलिसांचा व गृहरक्षक दलाच्या जवानांचा सत्कार मंगळवारी नगरसेवक योगेश पाटील यांनी करून गरजूंना जीवनावश्यक कीटचे वितरण केले.
सोयगावातील प्रभाग क्र-१४ मधील गरजूंना पुन्हा उभारी देण्यासाठी नगर सेवक योगेश पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचा व गृहरक्षक दलाचा सत्कार केला.यावेळी सोशल डीस्टेन्सचा वापर करून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरणही केले.यावेळी पोलीस नाईक संदीप पाटील,गृहरक्षक दलाचे जवान योगेश बोखारे,दिलीप शिंदे,शाम पाटील,अक्षय पाटील,भास्कर श्रीखंडे,राहुल पाटील,बाबूलाल शिंदे,अजय पाटील,दिलीप वाघ,अतुल आस्वार,सतीश राजनकर,ऋषिकेश हिवाळे,आदींची उपस्थिती होती.