सोयगाव दि.२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शासकीय कार्यालये निर्जंतुकीकरणनंतर शासन आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या व शासकीय कार्यालयात कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करून असून मंगळवारी सोयगावात तहसील आणि भूमीअभिलेख कार्यालयातील ५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आरोग्य विभागाने कोविड-१९ तपासणी केली असता शासकीय अधिकारी व कर्मचारी निरंक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.
सोयगाव तालुक्यात कोविड-१९ साठी संघर्ष करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथकाने मंगळवारी तब्बल ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोविड-१९ तपासणीचे काम हाती घेतले होते थर्मल गन आणि ऑक्सिजन तपासून कर्मचारी व अधिकारी निरंक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.कोरोना संसार्गात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या तहसीलदार प्रवीण पांडे,यांचेसह महसूल कर्मचार्यांची मंगळवारी तपासणी करण्यात आली.भूमीअभिलेख कार्यालयातही तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील नागरिकांचा वावर वाढल्याने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांचीहि कोरोना तपासनी करण्यात आली आहे.शासनाने आधी शासकीय कार्यालये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला होता.त्यानंतर जिल्हाभरात कोरोना संसर्ग बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढती होत आहे असे निदर्शनास आल्यावरून शासकीय कार्यालयातही कोरोना संसर्गाच्या तपासणीचे सत्र हाती घेण्यात आले आहे.त्यामुळे सोयगावचे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्याच्या शासकीय कार्यालयात कामांसाठी नागरिकांचा वावर वाढलेला आहे.त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाधा होवू नये यासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे.
शासनाच्या वतीने सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचार्यांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.त्यामुळे कोरोना संसर्गाच्या कामात अडकलेल्या कर्मचारी व अधिकारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
―प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव